'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 17 September 2013

रक्षाबंधनाला व्यसनांपासून भावाच्या रक्षणासाठी बहिणीकडून आरोग्यशिक्षणाची भेट

रक्षाबंधनाच्या दिवशी समीक्षा मुरकुटे (निर्माण ५) व तिचे सिनिअर डॉ. किटे यांनी नागपूरच्या ‘साहस’ व्यसनमुक्ती केंद्रात दारू व तंबाखूच्या आहारी गेलेल्या मित्रांसाठी आरोग्यशिक्षण केले. दारू व धूम्रपानाचे दुष्परिणाम हा या सत्राचा विषय होता. या सत्रात दारू व धूम्रपानाचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात याबद्दल इंटरनेटवरून डाउनलोड केलेले व्हिडीओ दाखवण्यात आले.
‘साहस’मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ३ महिने ‘साहस’मध्येच रहावे लागते. यातील अनेक रुग्ण नागपूर बाहेरील शहरातले होते. या रुग्णांना रक्षाबंधनाला घरापासून दूर रहावे लागल्यामुळे ती कमतरता भरून काढण्यासाठी समीक्षा व ‘साहस’मध्ये काम करणाऱ्या मुलींनी रुग्णांना राखी बांधली. ओवाळणी म्हणून रुग्णांनी त्यांना दारू व सिगरेट यांना परत न शिवण्याचे वचन दिले. ‘साहस’चे संचालक श्री. विजय शिंदे यांनाही समीक्षाने राखी बांधली. आजपर्यंतच्या आयुष्यातले हे सर्वांत सुंदर रक्षाबंधन असल्याचे समीक्षाने सांगितले. सामीक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन!

स्त्रोत- समीक्षा मुरकुटे, smurkute11@gmail.com

No comments:

Post a Comment