मला माफ करा
डॉक्टर दाभोळकर
तुम्ही गेल्यानंतर मी श्रद्धांजली सभेला गेलो नाही
मोर्च्यात ही गेलॊ नाही
अपराधी भावनेने मन भरून आलंय
तुमच्या १८ वर्षाच्या लढाईत मी काहीच का केलं नाही
समुद्राने पिल्ल नेलेल्या टिटविच्या आकांताने तुम्ही ओरडताना मी
समुद्राचे सौंदर्य बघत राहिलो
कधी ना तुमच्या आंदोलनात आलो … आंदोलनाच्या बाजूने लेख सोडाच साधे
वाचकांचे पत्रही लिहिले नाही
फक्त तुम्ही भेटल्यावर हवापाण्याच्या गप्पा माराव्यात तशी विधेयकाची
चौकशी करत राहिलो
क्रिकेटचा सामना बघावा तसा सरकार विरुद्ध अंनिस ही लढाई बघत राहिलो
प्रत्येक ख्रिस्ताला आपला क्रूस आपल्यालाच वाहून न्यावा लागतो …हे
लढाईच्या बाबतही खरे असते का ….?
तुम्ही आम्हाला हवे होता महाराष्ट्र फौंडेशनसाठी, साधनेसाठी,
व्याख्यान मालांसाठी, माझ्या पुरोगामी प्रतिमेला झळाळी
देण्यासाठी……यासाठी मला तुमची मैत्री हवी होती ….तुमच्या लढाईशी मला
काहीच घेणे नव्हते
मंत्रालयाच्या पायऱ्या दर अधिवेशनापूर्वी तुम्ही एकटेच चढत होता
आणि अधिवेशन संपल्यावर विधिमंडळातून एकटेच पायऱ्या उतरत होतात …।
मी मात्र मोजत होतो वर्षे क्रिकेटच्या सामन्यासारखी
तुम्ही गेल्यावर रस्त्यावर उतरलेल्या गर्दीच्या एक दशांश गर्दी तेव्हा
जरी उतरली असती तर तुमची तडफड, तगमग
कारणी लागली असती
तुमच्या मरणाची ब्रेकिंग न्यूज संपल्यावर तुमची जिवंतपणी उपेक्षा करणारे
आम्ही खरच लढणार आहोत का?
आता आम्ही म्हणतो आहोत गोळीने विचार संपत नाही
असेच आम्ही म्हणालो होतो गांधीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो सफदर हाश्मीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो शंकर गुहा नियोगीला संपविल्यावर …
पण आज वास्तव काय आहे डॉक्टर
मोदीमय गुजराथेत गांधी कुठे शोधायचे
सफदर हाश्मीचे राजकीय नाटक कोणत्या रस्त्यावर बघायचे
भांडवलदार आणी नक्षलवाद्यांनी वाटून घेतलेल्या छत्तीसगढ मध्ये नियोगी
कुठे शोधयाचे
आपल्या महान परंपरेनुसार जिथे गावोगावी तुम्ही शिव्या खाल्ल्या तिथे आता
तुमच्यासाठी गावोगावी हार आहेत
तुमचा स्मृतिदिन, तुमचे स्मारक, तुमच्या नावाने पुरस्कार हे सारं यथासांग
साजरे आम्ही करू
तुम्हाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना तुम्हाला १८ वर्षे ज्यांनी तळ-
तळ करायला लावली त्यांच्याकडून आम्हाला तुमचे
मोठेपण ऐकावे लागेल….
डॉक्टर
मला लाज फक्त याची वाटते की १८ वर्षे तुम्ही लढताना मी निष्क्रिय जिवंत होतो
तुम्ही असहाय्य पणे मारले जातांना मी जिवंत होतो ……

श्री. हेरंब कुलकर्णी
(ही कविता वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल श्री. हेरंब कुलकर्णी यांचे कृतज्ञतापूर्वक आभार)
No comments:
Post a Comment