नंदा खरे व विद्यागौरी खरे यांच्याबद्दल गटाकडून
कृतज्ञता व्यक्त
निर्माणचा नागपूरमधील गट मागील वर्षभर सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागी राहिला आहे. ह्या वर्षभरामध्ये त्यांना नागपूर व जवळच्या भागांमधील विविध
व्यक्ती / संस्था ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ह्या सर्व लोकांबद्दल कृतज्ञता
व्यक्त करण्यासाठी, व
मागील एका वर्षाच्या कामाचा आढावा घेण्याच्या हेतूने, आंतरराष्ट्रीय
युवा दिन्याचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी एका छोट्या
स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ह्या
प्रसंगी डॉ. अभय
बंग ह्यांनी “युवा पिढीसमोरील पुढील १०
वर्षांतील आव्हाने” ह्या विषयावर
मार्गदर्शन केले.
डॉ. बंग ह्यांनी
मुख्यत्वे भांडवलशाही व्यवस्था, धार्मिक
हिंसाचार आणि जागतिक
तापमानवाढ व पर्यावरणाचा ऱ्हास ही प्रमुख आव्हाने असून त्यांच्याबद्दल कृती करण्याची तातडीने गरज
असल्याचे सांगितले. पैसे कमविणे हे जगण्याच्या आयोजनाचे
केवळ एक साधन असून त्याला प्रयोजनाचे स्थान देऊ नये, तसेच मर्यादित स्वरूपात का होईना, पण आपल्या समाजाचे नेतृत्व स्वीकारून पुढे येणे व कृती करणे गरजेचे आहे असे आवाहन ह्यावेळी त्यांनी तरुणांना
केले. कशाला महत्व द्यायचे व आपले हित कशात मानायचे ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असेदेखील
त्यांनी युवकांना सांगितले
ह्याप्रसंगी नंदा
खरे व विद्यागौरी खरे ह्यांचे सर्व निर्माण गटाने त्यांच्या सततच्या
मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले. रंजन पांढरे (निर्माण ४) ह्याने मागील
वर्षभरातील निर्माण नागपूर गटाच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
स्रोत - रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com
No comments:
Post a Comment