काही
महिन्यांपूर्वी सौरभ सोनावणेला आपल्या तीन मित्रांची दारू सोडवण्यात यश आले होते.
हीच किमया सिगरेटच्या बाबतीत साधलीय मयूर दुधेला (निर्माण ५).
मयूर बी.जे. मेडिकल
कॉलेजचा विद्यार्थी असून त्याच्या एका शाळेपासूनच्या मित्राला सिगारेट पिण्याचे
वाइट व्यसन जडले होते. दिवसाला ४ ते ५ सिगारेट्स तो सहज पीत असे. फार्मसी शिकणाऱ्या ह्या मित्राचे व्यसन परीक्षेच्या
वेळी दिवसाला २ पाकिटे पिण्याइतके वाढायचे. वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने सांगून
देखील त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मयूरला मात्र वैद्यकीय शिक्षण घेताना
फुप्फुसाच्या, तोंडाच्या कर्करोगाचे अनेक रोगी सारखे पहायला
मिळत व त्यामुळेच आपल्या मित्राला व्यसनाच्या विळख्यातून सोडवणे किती गरजेचे आहे
ह्याची जाणीव होई. मयूरने ह्या विषयावर माहिती गोळा
करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान निर्माण ५ च्या पहिल्या शिबिरात व्यसनांचा विषय
हाताळण्यात आला. त्यानंतर मात्र मयूरने मित्राचे व्यसन सोडवण्याचा निश्चय केला. मयूर
व त्याच्या भावाने एके दिवशी ह्या मित्राला सिगरेटने होणाऱ्या
दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती दिली. तसेच त्यामुळे होणाऱ्या आर्थिक व सामाजिक
दुष्परिणामांची देखील जाणीव करून दिली. त्या दिवसापासून आपल्या मित्राने सिगरेट सोडल्याचे
मयूरने आवर्जून सांगितले. मयूरचे ह्या कामाबद्दल अभिनंदन!
व्यसन सोडवण्याचा
एक असा नेमका मार्ग नाही. आपल्याच सामूहिक अनुभवातून आपण व्यसनमुक्तीचे शास्त्र
शोधू शकतो का?
No comments:
Post a Comment