“शाळेतून पुस्तके नामशेष
होऊन मनुष्याला अवगत अशा कोणत्याही शाखेचं ज्ञान चलचित्राच्या सहाय्याने देणं शक्य
होणार आहे” असं एडिसनने १९१३ साली भाकीत केलं होतं. एडिसनला अभिप्रेत असणारी
शिक्षणक्षेत्रातली क्रांती १०० वर्षांनी प्रत्यक्ष सुरू झाली आहे. अतिशय कमी दरात
टॅबलेट्सची उपलब्धी, मोबाईल नेटवर्क्सचा वाढलेला वेग, खूप मोठा डेटा कमी जागेत
साठवून ठेवण्याची क्षमता, गेम्स व interactive software यांच्यात झालेली विलक्षण प्रगती या
सर्वांच्या आधारे Coursera, Khan Academy यासारखे उपक्रम खूप मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकले
आहेत. सर्वांना एकाच आकाराची शिक्षणाची
टोपी घालण्याऐवजी प्रत्येकाच्या डोक्याच्या आकाराप्रमाणे ही टोपीचे डिझाईन करणे
आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य होऊ लागले आहे. या बदलाला शिकवण्याची
मक्तेदारी असणारे शिक्षक कसा प्रतिसाद देतील?
येत्या काही वर्षांतली
शिक्षणक्षेत्राच्या भविष्याचा वेध घेणारा ‘E-ducation’ हा ‘The Economist’मधील लेख...
http://www.economist.com/news/leaders/21580142-long-overdue-technological-revolution-last-under-way-e-ducation
http://www.economist.com/news/leaders/21580142-long-overdue-technological-revolution-last-under-way-e-ducation
No comments:
Post a Comment