'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

खेळ खेळत आदिवासी मुलांचे जीवनशिक्षण !

निखिलेशचा आय.आय.टी. मुंबई येथील पीएचडी संशोधनाचा विषय

निखिलेश बागडेने (निर्माण २) आय.आय.टी. मुंबई येथील CTARA (Centre for Technology Alternatives in Rural Areas) येथून एम.टेक. केले आहे. मागील ३ वर्षे तो बाएफ़ ह्या संस्थेसोबत नंदुरबार येथील आदिवासी आश्रमशाळांबरोबर जीवनोपयोगी शिक्षणाचा एक प्रकल्प राबवीत होता. तो प्रकल्प पूर्ण झाला असून, तेथे काम करताना निखिलने आदिवासी मुलांना आरोग्य, शेती, सामाजिक न्याय इत्यादीबद्दल माहिती देणारे अनेक खेळ विकसित केले होते. अशा प्रकारे खेळातून विविध विषय शिकवण्याच्या ह्या प्रयत्नाला अधिक व्यापक स्वरूप देऊन ही पद्धती अधिक विकसित करण्याच्या हेतूने निखिलने आय.आय.टी. येथील IDC (Industrial Design Centre) येथे पीएचडी साठी प्रवेश घेतला आहे. त्याच्या विषय “आदिवासी केंद्रित शिक्षण” असा असणार असून प्रा. ए.जी. राव त्याचे मार्गदर्शक आहेत. त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. 
आय.डी.सी.बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.idc.iitb.ac.in/
स्रोत- निखिलेश बागडे. sumantalone@gmail.com

No comments:

Post a Comment