निर्माणची शिक्षण
प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या शिबिरार्थींच्या पुढील
क्षमता विकासासाठी आणि त्यांच्या कामाला वेग येण्यासाठी आयोजित केली जाणारी
प्रशिक्षण कार्यशाळा (ऑक्टोबर वर्कशॉप) दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ११ ते १६
ऑक्टोबर दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक समस्यांचे आव्हान घेऊन
आपल्या व्यक्तिगत जीवनात सीमोल्लंघन करणाऱ्या युवा सीमोल्लंघकांचाच जणू हा मेळावा..
यावर्षीच्या
कार्यशाळेत डॉ. आनंद करंदीकर, शेखर साठे, कुमार केतकर, प्रदीप लोखंडे, मकरंद करकरे, सुनिल चव्हाण या सामाजिक, राजकीय आणि व्यवसाय
क्षेत्रातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी निर्माणच्या युवांना मार्गदर्शन केले.
विकासाच्या विविध कसोट्या, फ्रेमवर्क्स काय व आपापले काम त्याच्याशी कसे संलग्न होऊ शकते यावर डॉ. आनंद
करंदीकर, अमर्त्य सेन – जगदीश भगवती या प्रसिद्ध
वादाबद्दल शेखर साठे व कुमार केतकर यांनी आपले विचार मांडले. रुरल रिलेशन्स व
ग्यान की लायब्ररीज या आपल्या इनोव्हेटिव्ह प्रयोगाची माहिती उद्योजक प्रदीप
लोखंडे यांनी दिली. सुनिल चव्हाण काकांनी आर्थिक व्यवस्थापनाबद्दल तर मकरंद
करकारेंनी ‘7 Habits of Highly Effective People’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित सेशन घेतले.
विचार, भावना व कृती यांची
पुरेशी रसद घेऊन आणि नवी क्षितिजे पार करण्यासाठीचा उत्साह घेऊन या युवांचा दसरा
साजरा झाला....
No comments:
Post a Comment