धुळ्यात
संदीप देवरे, ज्ञानेश मगर आणि
त्यांचे मित्र ‘संवाद लर्निंग सेंटर’ चालवतात. या सेंटरमध्ये १० ऑक्टोबर २०१३
ला  नाशिक, धुळे आणि
जळगाव मधील निर्माण शिबिरार्थीं व त्यांचे मित्र अशी १८ जणांची मिटिंग झाली.
याप्रसंगी
धुळ्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सुरेश थोरात याचं सुंदर सेशन झालं. १९८८
पासून अंनिसचं काम, जादूटोणा विरोधी
विधेयकाचा संपूर्ण इतिहास, त्या त्या वेळच्या सामाजिक,
राजकीय घटना यावर ते बोलले. या विधेयकातील विविध बाबी, विधेयकाला विरोध होण्याची कारणं इ. गोष्टी त्यांनी सांगितल्या. येत्या
अधिवेशनात या कायद्याचे भवितव्य ठरेल. जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात
मंजूर व्हावे यासाठी आपणही काही प्रयत्न करू असं वाटून - मुख्यमंत्र्यांना
इ मेल पाठवणे, सह्या गोळा करून त्या पाठविणे, शाळा - कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये या विधेयाकाविषयी माहिती देऊन पोस्ट
कार्ड लिहायला सांगणे असा कृती आराखडा आखला गेला.
त्यानंतर
सर्वांनी शेअरिंग केले. ज्यात, मी सध्या करत असलेल्या कामाचे स्वरूप व त्यातील अडचणी, मला माझ्या कामात काय मदत हवी आहे, जी या ग्रुपमधून
मिळू शकते, माझ्यात काय स्किल्स आहेत ज्यांची ग्रुपमधील
इतरांना मदत होईल यावर सगळे बोलले. या मिटिंगचे मुख्य फलित म्हणजे -  धुळे, नाशिक, जळगाव भागातील आम्हा सर्व निर्माणींची भेट झाली, एकमेकांच्या
कामाबद्दल, आणि कामात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती मिळाली,
या पुढे करावयाच्या Group Activities ठरवता
आल्या.
पुढची
मिटिंग १८-१९ जानेवारीला जळगावला होईल. एकूणच ही मिटिंग सर्वांसाठीच आनंददायी व
उत्साहवर्धक ठरली!

 
 
No comments:
Post a Comment