'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 4 November 2013

चॉकलेटचे पार्सल - ४

३ नोव्हेंबर, १३
प्रिय युवा मित्रांनो,

आज दिवाळी !
२०१३ ची दिवाळी सर्वांना आनंदाची व अंतर्बाह्य प्रकाशाची जाओ.

या महिन्यात ‘चॉकलेट पार्सल’मध्ये :

म. गांधींनी लिहिलेली प्रार्थना स्व. मन्ना डे यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहे निर्माणमधील जयप्रदचे आजोबा स्व. वसंत देसाई यांनी. या प्रार्थनेतील पहिल्याच ओळीत ईश्वराचे केलेले वर्णन ‘नाम्रातके सम्राट’ हे विलक्षण काव्यमय आहे. त्याचा अर्थ काय?

निवडणुकींचे पडघम वाजायला लागले आहेत. कोंग्रेस, भाजप, व तिसरी आघाडी तिन्ही आपापले ढोल वाजवत आहेत. लोकशाही व्यवस्थेविषयी विनोबांचे मुलभूत विचार

Social Media सर्व वापरतात. नशा यावा इतका. त्या विषयावरील एका नव्या कादंबरीची माहिती.

भूतानमध्ये आर्थिक विकास ऐवजी ‘समाधान विकास’ चा शोध कसा सुरु आहे? या विषयी काही.


नायना

No comments:

Post a Comment