'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

पुस्तक परिचय

तारांगण  सुरेश द्वादशीवार
तारांगण.. नावाप्रमाणे या पुस्तकामध्ये भारतातील काही निवडक ताऱ्यानविषयी लिखाण केले आहे. अर्थात हे तारे सर्व क्षेत्रांशी निगडीत आहेत. हे पुस्तक व्याक्तीचित्रणावर आधारित आहे. व्यक्तिचित्रण हा कठीण प्रकार असतो. कारण व्यक्तींचे वर्णन लेखकाने त्याच्या दृष्टीने केलेले असते. काही माणसांची एकच बाजू समाजाच्या  समोर आलेली असते त्यांच्या गुपित असलेल्या बाजू या लिखाणात मांडल्या गेल्या आहेत असे प्रस्तावनेत लेखक श्री सुरेश द्वादशीवार यांनी मांडले आहे. श्री द्वादशीवार हे नावाजलेले पत्रकार आहेत. तसेच संबंधित व्यक्तींशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे त्याचा अतिशय चांगला उपयोग त्यांना लिखाणाच्या वेळी झाला आहे.
या पुस्तकामध्ये काही ताऱ्यानविषयी माहिती आहे की ज्यांच्या चामाकाण्यामुळे भारताच्या समाजजीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. यात बाबा आमटेंपासून एम एफ हुसेन, आणि प्रमोद महाजन ते भिन्द्रानवाले पर्यंत सर्व समाविष्ट आहेत. काही फारशी परिचित नसणारी नावेही आहेत, जसे सविता डेका, चौधरी चरणसिंग, ई.
या व्यक्ती फार मोठ्या स्वरूपाचे सामाजिक, राजकीय कार्य करून गेल्या आहेत. काही सकारात्मक आहे तर काही नकारात्मक आहे. ते कार्य कसे घडले, त्यामागे त्यांची भूमिका काय होती याचे काही प्रमाणात चित्रण समोर येते. जसे जगासमोर येते तसेच चित्र त्या व्यक्तींच्या जीवनाच्या बाबतीत नसते. जसे अतिरेकी म्हणून ठरलेले भिन्द्रानवाले यांची मुलाखत घेताना त्यांच्यातील हळवी बाजू देखील समोर येते. त्यावर लेखकाने फार सुंदर लिहिले आहे भिन्द्रावाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला अन खुलवायला देशात एखादा गांधी असता तर.. .. तर कदाचित पंजाबच्या इतिहासाने घेतलेले ते दुर्दैवी वळण त्याच्या वाट्याला आले नसते.
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, सुरेश भात, बाबा आमटे, मातेराव कन्नमवारांपासून ते अगदी अलीकडील आपल्या परिचित असलेले प्रमोद महाजन पर्यंत नावे यामध्ये समाविष्ट आहेत. या माणसांचे पडद्यामागील जीवन, लेखकाशी त्यांचा आलेला संबंध याबद्दलचे वर्णन या पुस्तकात आहे. या माणसांनी महाराष्ट्राला एक सामाजिक, वैचारिक नेतृत्व दिले. त्या त्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती आदर्शवत ठरल्या यामागे त्यांचे कष्ट, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी या विषयीची माहिती काही प्रमाणात मिळते. तसेच  महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण या विषयी त्यांचा त्यावेळचा दृष्टीकोन आणि आत्ताची परिस्थिती याचा विचार आपण करू शकतो.
यातील व्यक्तींच्या जीवनात त्यांनी उद्गारलेली काही सुंदर वाक्ये या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातील नरहर कुरुंदकर यांचे जीवनाविषयीचे वाक्य आहे आपली गरज कायम आहे आणि समाजाचा लोभ शाबूत आहे तोवरच मारण्यात अर्थ आहे.
शेवटी हे व्यक्तिचित्रण आहे. यामधून आपण यातील ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो.

स्रोत : निखिल मुळ्ये, mulyenikhil@yahoo.com

No comments:

Post a Comment