औपचारिक
शिक्षण आणि शिक्षण पूरक उपक्रम यात विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग आणि कुतूहल असावे
यासाठी वर्गाखोलीचा आकार कसा असावा? एका वर्गासाठी किती
प्रमाणात बंद, अर्ध बंद आणि मोकळी जागा असावी? दोन वर्गांमध्ये अंतर कसे असावे? वर्ग खोल्या आणि
त्यांच्या स्वतंत्र मोकळ्या जागा यांची रचना कशी असावी?
या
प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते आहे कल्याणी वानखेडे (निर्माण ५). तिच्या Architecture च्या अभ्यासक्रमांतर्गत
तिच्या thesis चा
विषय 'Residential school based on
NAI TALIM system' हा होता. शाळेची वास्तू आणि इतर
पर्यावरणाचा शिक्षण प्रक्रियेवर होणाऱ्या परिणाम जाणून घेणे, विद्यार्थ्यांमधील संवाद व जिज्ञासा वाढविण्यात शाळेतील बांधकाम आणि विविध
जागांचा कसा उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करणे हा या विषयाचा एक भाग होता.
त्यासाठी
तिने Building as a learning aid, शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी, तोतोचान अशी पुस्तके
वाचून शिक्षण प्रक्रिया समजावून घ्यायचा प्रयत्न केला. शांतीनिकेतन, नई तालीम विषयक लेख आणि सोनदरा गुरुकुल बीड, आनंद
निकेतन सेवाग्राम, गुरुकुल बंगळूरू या शाळांची अभ्यास भेट
यातून काही निष्कर्ष काढायला मदत झाली. औपचारिक शिक्षण आणि इतर उपक्रम, त्यासाठी गरजेच्या शाळेतल्या सोई आणि जागा यांची आकडेवारी सादर करून,
नई तालीम पद्धतीप्रमाणे जास्तीत जास्त संवादाला पूरक, औपचारिक शिक्षण व विविध प्रयोगशील उपक्रमांना एकत्र आणणारा शाळेचा परिसर डिज़ाइन
करण्याचा हा प्रयत्न होता.
या
अभ्यासादरम्यान मला लक्षात आले की,
* अष्टकोनी अथवा गोल बसण्याची व्यवस्था सर्वात उपयुक्त
आहे. त्यात खोलीचा आकार चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असू शकेल.
* एका वर्गात : बंद जागा ५० % , अर्ध मोकळी जागा ३० %
आणि मोकळी जागा २० % असणे फायद्याचे
* दोन वर्गांमध्ये अंतर असावे, वर्ग खोल्या आणि त्यांच्या स्वतंत्र
मोकळ्या जागा असाव्यात.
वरील मुद्दे अधिक स्पष्ट करण्यास
सोबत जोडलेली आकृती मदत करेल.
No comments:
Post a Comment