'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 4 November 2013

लोकशाहीच्या व्यवस्थेत मुळातच बदल करावा लागेल - विनोबातुम्हाला 'लोकशाहीच्या व्यवस्थेत मुळातच बदल करावा लागेल' हा लेख आवडला का?

4 comments:

 1. प्रिय नायना,

  तुम्ही chocklet पार्सल साठी निवडलेला "लोकशाही व्यवस्थेत मुळातच बदल करावा लागेल " विनोबांचा हा लेख छान आहे ह्यात काही प्रश्नच नाही ,त्यांनी त्यात लोकशाहीची जी व्याख्या केली ती फार भारी आहे आणि त्यावर कृती करण्याजोगी आहे "परस्परांच्या हितामधील विरोध दूर होईल,सर्वांचे हित एक अशी भावना निर्माण होईल ,सर्व एकत्र बसून विचार करतील ,एकत्र येऊन निर्णय करतील आणि एकमेकांच्या सहयोगाने काम करतील व सर्वभूत हित हा पाया होईल "हीच वास्तविक लोकशाही आहे .आणि ह्याचे प्रत्याक्षीकरण निर्मांणच्या शिक्षण प्रक्रियेत आम्ही तुमच्या मार्गदर्शनातून शिकतोच आहोत..
  तसेच त्यात विनोबांनी म्हटल कि पश्चिमेच्या आपण स्वीकारलेल्या लोकशाहीचे भारतीयकारण हे त्यात संशोधन व परिमार्जन करून करायला हवे ,व ह्या निर्जीव लोकशाही मध्ये प्राण ओतण्याचे काम अहिंसा ,प्रेम ,स्वेच्छा आणि सहयोग हे करेल ..
  तसेच ग्रामसंस्कृती हीच आपल्या आपल्या देशाची शक्ती आहे असे विनोबांनी म्हटल आहे ,तर ह्या ग्रामसंस्कृतीच्या स्वरूपाबद्दल व ह्यातून देशाचा विकास कसा होईल ह्या बद्दलचा लेख वाचायला आवडेल .....

  आपला निर्माणी
  भूषण देव.

  ReplyDelete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. असे वाटत राहते कि विनोबा इतके अध्यात्मिक आहेत का कि ते वास्तवापासून दूर जात असावेत ?
  बाबा आमटेंच्या शब्दात सांगायचे तर
  "एक जहाज बंदर गाठण्याच्या बेतात असतांनाच किनाऱ्याशी येऊन फसलेले, कोणी ते कोळीष्टकात गुंतलय असं समजून अध्यात्माच्या हलक्या हातांनी उकलू पाहतय" .. ?

  सगळ्यात मोठा गोंधळ तेव्हा उडतो जेव्हा सत्ता केंद्रित होऊ नये आणि गावोगाव विभागली गेली पाहिजे असे वरील लेखात म्हणणारे विनोबा, इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे "अनुशासन पर्व" असे म्हणून समर्थन करतात. आता आपण लोकशाही for granted घेतो. पण तेव्हा भारताचा पाकिस्तान होऊ शकला असता आणि भारत लष्करशाही आणि लोकशाहीत हिंदकळत राहिला असता. आशा वेळी आलेल्या संकटांची समाजाला जाणीव करून देणे आणि सरकारला खडसावणे अपेक्षित नाही का? नेमक्या ह्याच वेळी विनोबांच्या दूरदृष्टीची आणि ज्ञानाची खरी गरज समाजाला नाही का? संगतीच नाही लागत...

  ReplyDelete
  Replies
  1. प्रिय समीर,
   १. विनोबांनी ‘अनुशासन पर्व’ असे म्हणून आणीबाणीचे समर्थन केले नव्हते. उलट त्यावेळी त्यांचे वर्षभर मौन असल्याने त्यांनी महाभारत पुस्तकातील ‘अनुशासनपर्व’ शब्दावर बोट ठेवून प्रश्न विचारला होता. इंदिरा गांधीचे मंत्री वसंतराव साठे यांनी त्याचा विपर्यास करून पत्रकारांना खोटी माहिती दिली. आणिबाणीमध्ये शासनाने अशी अनेक खोटी विधाने केलीत. (वास्तव काय घडले हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित दोन लोकांनी ग्रंथित केले आहे. १. कुसुम देशपांडे, विनोबांचे सचिव व लेखनिक २. श्री. घुमरे, संपादक – तरुण भारत)
   २. विनोबांची समाज परिवर्तनाची पद्धती संघर्ष ऐवजी समन्वयाची होती. त्यासाठी त्यांची ‘सत्याग्रह विचार’ व ‘अहिंसाकी खोजमे’ ही परमधाम प्रकाशनाची पुस्तके जरूर वाच.
   - नायना

   Delete