'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

ऋतगंधा देशमुख सर्च मध्ये संगणक विभागात रुजूनिर्माण ४ ची ऋतगंधा देशमुख १८ ऑक्टोबर पासून सर्च मध्ये संगणकविभागात ‘Associate Software Engineer’ म्हणून  रुजू  झाली.

ऋतगंधा मुळची औरंगाबादची राहणारी. ऋतगंधाने MCA (Masters in Computer Application) हा अभ्यासक्रम २०१२ साली पूर्ण केला. सर्चमध्ये येण्याआधी एक वर्ष ती औरंगाबादमधील देवगिरी कॉलेजमध्ये  Peripheral Interface आणि Database Management हे विषय शिकवायची. 
ऋतगंधावर पुढील एक वर्षात -  सर्चच्या गरजेप्रमाणे नवीन सोफ्टवेअर बनवणे, सध्या वापरत असलेले सोफ्टवेअर्स सुरळीत चालू राहतील याची काळजी घेणे, सर्चची वेबसाईट सांभाळणे व अपडेट करत राहणे, तसेच संगणक विभागातील इतर दैनंदिन कामे पाहणे, अशा कामांची जवाबदारी राहील. या कामामध्ये श्री महेश देशमुख सर तिला मार्गदर्शन करतील.


स्रोत : ऋतगंधा देशमुख, hrt.deshmukh@gmail.com

No comments:

Post a Comment