प्रीती
बंगाळ (निर्माण ४) हिने तिचे पदव्युत्तर शिक्षण M.Sc. in Biodiversity, पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले.
शिक्षण घेत असताना प्रीती पक्ष्यांमधील विविधतेवर अभ्यास करत होती. याच क्षेत्रात
पुढे अभ्यास करण्यात प्रीतीला रस होता. अशातच शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रीतीला
बंगलोर येथील Indian Institute of Sciences या संस्थेसोबत संशोधन करण्याची
संधी चालून आली. मुळातच निसर्गाची आवड आणि या क्षेत्रात अभ्यास करण्याची इच्छा
असल्याने प्रीतीने ही संधी लगेचच स्वीकारली.
या अभ्यासात
प्रीती आणि तिचे सहकारी मुख्यतः जंगलांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या
बीजप्रसाराच्या विविध पद्धतींचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी दक्षिण भारत आणि
उत्तराखंड येथील पानझडीच्या जंगलांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यासात झाडांची
वैशिष्ट्ये, नेमके कोणकोणते
प्राणी-पक्षी बीजप्रसारण करतात, बीजप्रसारण हे कोणकोणत्या
माध्यमांद्वारे होते(वारा,पाणी,प्राणी-पक्षी),
जंगलांचे भवितव्य कसे असेल आणि निसर्गातील या सर्व घटकांचा
परस्परांसोबत कसा संबंध आहे यावर भर दिला जाणार आहे.
नुकताच
प्रीतीने दक्षिण भारतातील अभ्यास पूर्ण केला आहे आणि यापुढील दोन ते तीन महिने
प्रीती व तिचे सहकारी उत्तराखंडमधील जंगलांमध्ये अभ्यास करणार आहेत. वीज,पाणी अशा कोणत्याही सुविधा नसलेल्या
भागात राहून प्रीती हे काम करत आहे. प्रीतीला पुढील प्रवासासाठी निर्माण
परिवारातर्फे खूप शुभेच्छा!!
No comments:
Post a Comment